scholarships या विद्यार्थ्यांना भेटणार ३० हजार रुपये .. सरकारचा मोठा निर्णय

scholarships केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभागामार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती लागू केली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी आणि अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करता येणार आहेत.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरील (एनसीपी) सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. या प्री-मॅट्रिक योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या कालावधीत ऑनलाइनद्वारे भरावेत, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी केले…..

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’चे पात्रता निकष खालीलप्रमाणे..
– अनुदानित शाळांतील इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दिली जाते ही शिष्यवृत्ती
– विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा जास्त असावे.
– सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र कायद्यानुसार असावे
– शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहील.
– पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे
शिष्यवृत्तीची रक्कम
– दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेली वार्षिक प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती नऊ हजार ते १४ हजार ६०० रुपये इतकी आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय या मुलींना मिळणार आता १लाख रुपये.. 👇👇

शिष्यवृत्तीसाठी नोंदणी व अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक :
– ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत : ३० नोव्हेंबर
– शाळास्तरावरील अर्ज पडताळणी अंतिम तारीख : १५ डिसेंबर
– जिल्हा स्तर अर्ज पडताळणी मुदत : ३० डिसेंबर
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ
www.scholarships.gov.in
www.depwd.gov.in.

Leave a Comment