चहात साखरेऐवजी टाका चेहऱ्याला लावायची पावडर ; होईल असा चमत्कार

Tea Jugaad Video : बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या गरमा गरम वाफाळलेल्या चहाने करतात. आपण भारतीयांचा दिवस सकाळच्या चहाशिवाय सुरू होत नाही. चहा बनवताना आपण त्यात पाणी, साखर, चहापावडर आणि दूध टाकतो. पण तुम्ही चहात कधी टाल्कम पावडर टाकून पाहिली आहे का? टाल्कम पावडर आणि चहात, तुम्हाला विचित्र वाटेल. पण हा उपाय फायद्याचा आहे. पण एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. @AvikaRawatFoods युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, पहिल्यांदा या गृहिणीनं एका भांड्यात गरम पाणी घेतलं त्यात चहा पावडर टाकली ते उकळल्यानंतर गाळणीनं ते गाळून घेतलं. आता गाळलेल्या पाण्यात टाल्कम पावडर टाकली आहे.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

आता हा असा चहा तुम्हाला प्यायचा आहे का? तर बिलकुल नाही. हा चहा पिण्यासाठी नाही तर वेगळ्याच कारणासाठी आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापासून ते रात्री झोपताना आरशात बघून झोपणारे अनेक जण असतात. बाथरुममधल्या आरशांवर टुथपेस्ट किंवा दाढीचे क्रिम उडाल्यामुळे त्यात चेहरा दिसेनासा होतो. तर ड्रेसिंग टेबलच्या आरशाला हाताचे किंवा सौंदर्यप्रसाधनांचे डाग लागलेले पाहायला मिळतात.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

हे डाग वेळच्या वेळी काढले नाहीत तर नंतर ते काढण्यासाठी Tea Jugaad Video खूप कष्ट पडतात. त्यामुळे ज्याच्यात घरातील प्रत्येक जण स्वत:ला न्याहाळतो तो आरसा स्वच्छ नको का करायला. पण कसा? तर वर सांगितल्यानुसार जे त्या गृहीणीने केलं तसंच तुम्हालाही करायचं आहे. टाल्कम पावडर टाकलेल्या या चहाचा वापर अनोखा आहे. तुम्ही या चहाने काच स्वच्छ करू शकता. आरसा, खिडक्या स्वच्छ करू शकता. त्यामुळे तुमचा खर्चही वाचेल. तुम्ही अशा पद्धतीने एकदा आरसा स्वच्छ करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

Leave a Comment